मुंबई कस्टम ड्युटी, कर सहाय्यक भरती 2020 आणि TET प्रश्नपत्रिकेत चुका
1) मुंबई कस्टम ड्युटी, मुंबई येथे कर सहाय्यक (खेळाडू) पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.
पदाचे नाव – कर सहाय्यक (खेळाडू)
पद संख्या – १३ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त कार्यालय (कस्टम), नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.
2) पुणे महानगरपालिका, पुणे येथे कानिष्ट अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी जाहिरात वाचावी.
सदर भरती fix मानधन तत्वावर आहे
पदाचे नाव – कानिष्ट अभियंता (स्थापत्य)
पद संख्या – २५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी शाखेची पदवीधर असावा.
नोकरी ठिकाण – पुणे
वेतन –
पदवी – रु.३५०००/-
पदविका – रु.३००००/-
अधिकृत वेबसाईट https://pmc.gov.in/en
3) नांदेड येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व कौशल्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख २७ जानेवारी २०२० आहे.
मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व कौशल्य मेळावा
भरती – खासगी नियोक्ता
विभाग – औरंगाबाद
जिल्हा – नांदेड
मेळाव्याचा पत्ता – रोजगार कार्यालय जवळ, कैलाश नगर, वर्कशॉप रोड, नांदेड
मेळाव्याची तारीख – २७ जानेवारी २०२० आहे.
अधिक माहितीसाठी लिंक वर क्लीक करा
4) पश्चिम मध्य रेल्वे येथे प्रशिक्षु अप्रेन्टिस पदांच्या एकूण १२७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फरवरी २०२० आहे.
पदाचे नाव – प्रशिक्षु अप्रेन्टिस
पद संख्या – १२७३ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी आणि आई.टी.आई
अर्ज पद्धती -ऑनलाईन
वय मर्यादा – २४ वर्ष
वेबसाईट – www.wcr.indianrailways.gov.in
PDF download साठी क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ फेब्रुवारी २०२०
★★★ IMPORTANT NOTICE ★★★
MahaTET Mistakes मोठी चूक
राज्यात आज जवळपास 3 लाख 43, हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली. या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब आता समोर आली आहे. यंदा पेपरमध्ये योग्य जोड्या जुळवा, असा प्रश्न देण्यात आला होता. मात्र रकाण्यांमध्ये वेगळेच पर्याय देण्यात आले होते. तसेच वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला, मात्र वाक्याखाली अंडरलाईन करण्यात आलेलीच नव्हती.
याशिवाय आजच्या टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असे अनेक चुकीचे प्रश्न होते. या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब अशी की, दोन्ही पेपरमध्ये शुद्धलेखनाच्या गंभीर चुका आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी वर्गात नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांकडून आता या चुकीच्या प्रश्नांचे गुण आम्हाला मिळावेत, अशी मागणी केली जात आहे.
MahaTET Mistakes
मागील वर्षी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेतही प्रश्नपत्रिकेत अशा चुका असल्याचं समोर आलं होतं. परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले नव्हते.
परंतु यावर्षी जर गुण देण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा शिक्षकभारती संघटनेनं दिला आहे. आत्तापर्यंत राज्यात 7 वेळा टीईटीची परीक्षा झालेली आहे. मात्र भरती प्रक्रिया अद्याप राबवण्यात आलेली नाही. राज्यात जवळपास दीड लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.
महाटीईटी २०२० परीक्षा झाली, उत्तरतालिका..
शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) रविवारी बालमानसशास्त्र, गणित विषयातील गुगली प्रश्नांनी भावी गुरुजींची विकेट काढली. पेपर-१, पेपर-२ मधील या दोन्हीतील प्रश्नांची उकल करताना बुद्धिमत्तेचा कस लागल्याची भावना परीक्षार्थींनी व्यक्त केली. त्यामुळे निकालावर परिणाम होईल, असेही बोलले जात आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेला शहरातील ४४ केंद्रांवर सकाळ व दुपार, अशा दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी शहरातून १८ हजार ८५ जणांनी नोंदणी केली होती.
इयत्ता पहिली ते पाचवी स्तरासाठीच्या पेपर-१ ला सर्वाधिक १० हजार ३२९ परीक्षार्थी, तर माध्यमिकस्तरावरील पेपर-२ला सात हजार ७५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
पेपर-१ मध्ये इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित, परिसर अभ्यास असे विषय.
पेपर-२ मध्ये इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, सामाजिक विज्ञानचा समावेश होता. प्रत्येक पेपर १५० गुणांचा होता, प्रत्येक प्रश्नाला एक गुण देण्यात आला आहे.
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित विषयातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती. बालमानसशास्त्रातील गुगली प्रश्नांनी गोंधळ उडाल्याचेही अनेक परीक्षार्थींनी पेपर संपल्यानंतर बोलताना सांगितले. त्यामुळे परीक्षार्थींचे आता निकालाकडे लक्ष लागले आहे.
वर्धा आणि हिंगोलीत परीक्षा केंद्रांवर गोंधळ
टीईटी परीक्षेला वर्धा आणि हिंगोलील काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वर्ध्यात टीईटी परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला न्यू इंग्लिश केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला नाही. विद्यार्थ्यांना येण्यास उशीर झाल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं. मात्र आम्ही वेळेत आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.हिंगोली शहरातील एकूण बारा परीक्षा केंद्रावर दोन सत्रात टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली आहे. तेथेही उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे.
आदर्श महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर सकाळी 10.10 वाजता गेट बंद करण्यात आला. त्यामुळे 20 ते 25 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. टीईटी परीक्षेसाठी आलेल्या भावी शिक्षकांनी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडे विनंती करून देखील प्रवेश न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
IMPORTANT NOTICE
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यात पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग या पदाच्या मुलाखती २३ व २४ जानेवारी रोजी एमपीएससीच्या मुख्य कार्यालयात होणार होत्या. मात्र, या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, ३० जानेवारी रोजी एकाच दिवशी सकाळी साडेनऊपासून सर्व मुलाखती होणार आहेत.
महाराष्ट्र बोर्ड भरती परीक्षेत गैरप्रकार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी घेतलेल्या ‘ऑनलाइन’ परीक्षेच्या निकालात गैरप्रकार झाल्याची दाट शक्यता असून, राज्यात पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांनी उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थ्यांचे एकसारखे सहा प्रश्न चुकले आहेत.या परीक्षार्थ्यांना निकालात २०० पैकी १९४ गुण असून, राज्यसेवा मुख्य परीक्षेसारख्या परीक्षा देणाऱ्यांना १६० गुणही मिळवता आलेले नाही. या निकालात उत्तम गुण मिळवणारे संशयाच्या भोवऱ्यात असून, त्यांनी ‘हायटेक कॉपी’ किंवा ‘रीलॉगइन’ करून परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारामुळे परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या महापरीक्षा पोर्टलचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे निकाल आणि भरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी एमपीएसससी समन्वय समितीमार्फत करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, नाशिक, लातूर, कोकण विभागीय मंडळामध्ये एकूण २६६ कनिष्ठ लिपिक पदासाठीची परीक्षा गेल्या महिन्यात पार पडली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्या निकालात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची शक्यता आहे.
ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलने ऑनलाइन पद्धतीने सकाळ आणि दुपारच्या सत्रात घेतली. अनेक तांत्रिक कारणांमुळे या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला होता. काही परीक्षा केंद्रांवरील परीक्षा रद्द करावी लागली होती.
या परीक्षेत २०० प्रश्न होते; तसेच प्रत्येक प्रश्नाला एक गुण होता. या निकालात पहिल्या सहा क्रमाकांवरील परीक्षार्थ्यांना १९४ गुण असून, त्यापैकी पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांनी उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थ्यांचे एकसारखे सहा प्रश्न चुकले आहेत. या तिन्ही परीक्षार्थ्यांनी ५ डिसेंबरला सकाळी १० ते १२ या वेळेत परीक्षा दिली असून, पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे परीक्षार्थी एकाच परीक्षा केंद्रावरील आहेत.
तर, चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थ्याचे परीक्षा केंद्र देखील त्याच परिसरातील आहे. पहिल्या ५० क्रमांकांपर्यंत अशा प्रकारचा घोळ काही परीक्षार्थ्यांच्या बाबतीत झाला आहे. याशिवाय १७ आणि २१ क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्यांना एकसारखे १८७ गुण असून, त्यांचे प्रश्नदेखील सारखेच चुकले आहेत. त्याचप्रमाणे दोघांचेही परीक्षा केंद्र आणि वेळ एकसारखी आहे. परीक्षार्थ्यांच्या रिस्पॉन्स शीटद्वारे ही माहिती समोर आली आहे.
या परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर छोटा बटन कॅमेरा, ब्लू-टूथ मायक्रोफोन कानात लावून ‘हायटेक कॉपी’ केल्याची दाट शक्यता आहे. काही परीक्षार्थ्यांनी परीक्षेची वेळ संपल्यानंतर पुन्हा ‘रीलॉगइन’ करून परीक्षा दिल्याचा आरोप अनेक परीक्षार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे राज्य मंडळाच्या पदभरतीत प्रामाणिक आणि गुणवंत उमेदवारांवर अन्याय झाला असून, सरकारी नोकरीपासून ते दूर असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन महाआयटी विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी अजित पाटील यांनी दिले आहेत.
मी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली असून, या परीक्षेत १३४ गुण मिळाले. या परीक्षेमध्ये १९४ गुण मिळालेले सहा परीक्षार्थी आहेत. त्यानंतर थेट १८७ गुण मिळवणारे परीथार्थी आहेत. ‘एमपीएससी’द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या निकालात राज्यात पहिला येणार विद्यार्थी आणि कटऑफ गुणांमध्ये साधारण ६ गुणांचे अंतर असते. मात्र, इथे कट ऑफ गुणांवर निवड झालेला आणि प्रथम आलेल्या परीक्षार्थ्यामध्ये गुणांचे खूप अंतर आहे. या संपूर्ण निकालात घोळ आणि गैरप्रकार झाला आहे.
– महेश इंगोले, परीक्षार्थी






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा